बोईसरमध्ये कर्करोग तपासणी शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोईसरमध्ये कर्करोग तपासणी शिबिर
बोईसरमध्ये कर्करोग तपासणी शिबिर

बोईसरमध्ये कर्करोग तपासणी शिबिर

sakal_logo
By

बोईसर (बातमीदार) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मनसे विद्यार्थी सेना, इंडियन कॅन्सर सोसायटी (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने बोईसरमध्ये दोन दिवसांचे विनामूल्य कर्करोग तपासणी शिबिर मेट्रो फिनिक्स हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आले होते. मनसेचे पालघर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भावेश चुरी यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बोईसर तारापूर एमआयडीसीच्या परिसरात कर्करोग रुग्णसंख्या वाढत आहे. शिबिरामध्ये इंडियन कॅन्सर सोसायटीमार्फत पुरुषांसाठी संपूर्ण शारीरिक तपासणी करण्यात आली. या शिबिरासाठी डॉ. अक्षय नाडकर्णी, माधव देवकाटे, अनंत नागरगोजे, उपसरपंच विवेक वडे, मान सरपंच अंजली भावर, कामगार नेते अनंत दळवी, शिवाजी रेंबाळकर, चेतन संखे आदी उपस्थित होत. विनामूल्य कर्करोग शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली होती.