छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे आयोजन
छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे आयोजन

छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे आयोजन

sakal_logo
By

उरण (वार्ताहर) : छत्रपती संभाजी महाराजांची रविवारी (ता. १४) जयंती असल्याने महाराष्ट्रात विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. उरणमधील छावा प्रतिष्ठान चिरनेरतर्फेही रायगड जिल्ह्यातील सर्वांत मोठी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळ्याचे आयोजन चिरनेर श्री दत्त मंदिर येथे केले आहे. सकाळी ९ वाजता प्रतिमा पूजन, १० वाजता सत्यनारायणाची महापूजा, दुपारी ३:३० वाजता छत्रपती संभाजी महाराज पालखी मिरवणूक सोहळा, संध्याकाळी ७ वाजता महाप्रसाद, रात्री ९ वा. ऐतिहासिक मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहे. या जयंती सोहळ्याला काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, माजी आमदार मनोहर भोईर, माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, उद्योजक एकनाथ पाटील, केअर ऑफ नेचरचे अध्यक्ष राजू मुंबईकर, इंटकचे रायगड जिल्हाध्यक्ष किरीट पाटील, माजी सभापती भास्कर मोकल, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी, काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांची उपस्थिती लाभणार आहे.