वनक्षेत्रात गर्दुल्ले, मद्यपींची घुसखोरी

वनक्षेत्रात गर्दुल्ले, मद्यपींची घुसखोरी

घणसोली, ता. ११ (बातमीदार)ः शेतकरी शाळेसमोर महापालिकेने लावलेले रेलिंग तुटले आहेत. त्याचा फायदा घेत गर्दुल्ले, मद्यपींचा वनक्षेत्रात वावर वाढला असून झाडे तोडण्याचे प्रकारही होत आहेत.
नवी मुंबई महापालिकेने शहरात नागरिकांसाठी असुरक्षित असणाऱ्या जागांवर लोखंडी रेलिंग बसवले आहेत. घणसोलीत शेतकरी शाळेसमोरील नाल्याच्या कडेला वनक्षेत्र परिसरात महापालिकेने असे रेलिंग बसवले आहेत. मात्र, काही दिवसांपासून हे रेलिंग दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे या वनक्षेत्राचा बेकायदेशीर वापर केला जात आहे. तसेच याठिकाणी कोणाचा वावर नसल्याने प्रेमी युगुले, गर्दुल्ले तसेच मद्यपींच्या पार्ट्या चालत असल्याने भविष्यात एखादी अघटित घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महापालिकेने याठिकाणी रेलिंग बसवून वनक्षेत्राचा बेकायदा होत असलेला वापर थांबवावा, अशी मागणी होत आहे.
--------------------------------------------------
शेतकरी शाळेसमोर रेलिंग तुटल्याने वनक्षेत्रात बेकायदा घुसखोरी केली जात आहे. यामुळे भविष्यात अघटित घटना घडण्याची शक्यता आहे.
- नारायण सुर्वे, नागरिक
---------------------------------------------------
घणसोली शेतकरी शाळेसमोर काही दिवसांपूर्वी वाहनाचा अपघात झाला होता. त्यामुळे याठिकाणी असलेले रेलिंग तुटले आहे. काही दिवसांतच या ठिकाणी रेलिंग बसवले जातील.
- रमेश गुरव, अभियंता, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com