गटाराच्या नूतनीकरणासाठी मार्ग बंद

गटाराच्या नूतनीकरणासाठी मार्ग बंद

कांदिवली, ता. ११ (बातमीदार) ः कांदिवली पूर्वेला अशोकनगर महापालिका मराठी शाळेच्या मैदानाला लागून असलेल्या आत्मीय मार्गाच्या गटाराचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी ठेकेदाराने चक्क तीन दिवसांपासून मार्गच बंद केला आहे. यामुळे वाहनचालकांची दिशाभूल होऊन वाहतुकीची कोंडी होत आहे. त्‍यामुळे मार्ग एकतर्फी खुला करावा, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.
कांदिवली पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या हुतात्मा राजगुरू उड्डाणपुलावरून पूर्वेला खाली येताच डावीकडे अशोकनगर पालिका शाळेचे मैदान आहे. बाजूलाच असलेल्या आत्मीय मार्गाने वाहने स्टेशनकडे जातात. मैदानाच्या बाजूने जेसीबीच्या साह्याने खोदकाम करून, माती, दगड आणि डबर भरण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी अडथळा होऊ नये म्हणून गेले तीन दिवसांपासून मार्गच बंद करण्यात आला आहे. यामुळे नेहमीच्या सवयीप्रमाणे वाहनचालक डावीकडे वळतात. पुढे मार्ग बंद असल्याने, वाहन थांबवून मागे घेतात. या वेळी मागील वाहने थांबतात, नंतर पुढील अशोक चक्रवर्ती मार्गाने जातात. यामुळे वाहतुकीची कोंडी होते. वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. योग्य मार्गदर्शन किंवा फलक लावण्यात आला नसल्यानेच वाहनचालकांना फेरा पडत आहे. त्‍यामुळे येथे पालिकेने पुढे मार्ग बंद आहे, असा फलक लावला पाहिजे, असे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते नितीन लोहोट यांनी सांगितले.

अत्‍यावश्‍यक काम येथे सुरू आहे. मार्ग अरुंद आहे. सुपरवायझरला सांगून योग्य निर्णय घेण्यात येईल.
ः- समीर सानप, अभियंता, आर दक्षिण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com