भुमाफियांचा नायब तहसिलदारासह तलाठ्यावर हल्ला

भुमाफियांचा नायब तहसिलदारासह तलाठ्यावर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : मुंब्रा येथील डावले गाव या ठिकाणी भूमाफियांनी शासकीय भूखंडावर दोन-तीन मजली इमारत उभारून अतिक्रमण केले होते. बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयांचे अंतर्गत तहसीलदार ठाणे येथील नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांच्या माध्यमातून व ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यास सुरू केली. ही इमारतीला पाडल्यानंतर भूमाफियांनी घोळका करून नायब तहसीलदार दिनेश पैठणकर व शिळ तलाठी रोहन वैष्णव यांच्यावर हल्ला केला; पण स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यनतंर भूमाफियांनी तेथून पळ काढला.
नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांच्यासह तलाठ्यावर हल्ला केल्याप्रकरणी शीळ डायघर पोलिस ठाण्यात तीन भूमाफियाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी डावले गावमधील त्या नागरिकांना एक महिन्याची मुदत दिली आहे. त्यानंतर ही कारवाई पूर्ण करणार असल्याचे पैठणकर यांनी सांगितले. याकारवाई वेळी मंडळ अधिकारी रवींद्र काळे, तलाठी रोहन वैष्णव, तलाठी विश्वनाथ राठोड, तलाठी जीवन कोरे, तलाठी प्रीती घुडे, तलाठी राहुल भाटकर, तलाठी राहुल भोईर आणि ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com