Fri, Sept 22, 2023

डोळखांबमध्ये रंगणार वसंतबहार कार्यक्रम
डोळखांबमध्ये रंगणार वसंतबहार कार्यक्रम
Published on : 11 May 2023, 10:47 am
किन्हवली, ता. ११ (बातमीदार) : डोळखांबसारख्या दुर्गम भागात कार्यरत असणाऱ्या जय मल्हार सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या संस्थेचा द्वितीय वर्धापन दिन येत्या २८ मे रोजी सायंकाळी ६ वाजता डोळखांब येथे वसंतबहार या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत असलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. सोबतच नृत्य, गायन, वकृत्व अशा तिहेरी मैफिलीचेही आयोजन करण्यात आले आहे. संस्थेने आजवर कौशल्य विकास अभियानांतर्गत शेकडो तरुण-तरुणींना रोजगार निर्माण करून दिला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष संदेश पाटेकर व सचिव दयानंद पाटोळे यांनी दिली.