Wed, Sept 27, 2023

राज ठाकरे आज भाईंदरमध्ये
राज ठाकरे आज भाईंदरमध्ये
Published on : 11 May 2023, 12:06 pm
भाईंदर, ता. ११ (बातमीदार) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी मेळावा, तसेच मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे शुक्रवारी (ता. १२) भाईंदरमध्ये येणार आहेत. मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा भाईंदर पूर्व येथील इंद्रवरुण सभागृहात शुक्रवारी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित रहाणार आहेत. त्याचप्रमाणे नवघर रस्त्यावरील बाळकृष्ण नगर याठिकाणी मनसेचे मध्यवर्ती कार्यालय स्थापन करण्यात आले असून त्याचे उद्घाटनही राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती मनसेचे शहर अध्यक्ष हेमंत सावंत यांनी दिली.