सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी ५५० झाडांची कत्तल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी ५५० झाडांची कत्तल
सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी ५५० झाडांची कत्तल

सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी ५५० झाडांची कत्तल

sakal_logo
By

सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी ५५० झाडांची कत्तल
मुंबईकरांकडून मागवल्या हरकती सूचना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ ः वांद्रे येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा विस्तार करण्यासाठी तब्बल ५४७ झाडांची कत्तल केली जाणार आहे. झाडांची कत्तल करण्याआधी मुंबईकरांकडून हरकती, सूचना मागवल्या आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी झाडांची लागवड करा, असे आवाहन करणाऱ्या मुंबई महापालिकेला वृक्षांच्या संवर्धनाचा विसर पडला आहे, असा सवाल पर्यावरणावर काम करणार्‌या कार्यकर्त्यांनी केला आहे.
पालिकेने सात ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्राची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी धारावी येथील ट्रीटमेंट प्लांटच्या विकासासाठी ४०३ झाडांची कत्तल करण्याचा निर्णय घेतला आहे; तर आता वांद्रे येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या विकासकामांसाठी ५४७ झाडांची कापणी करण्यासाठी नोटीस काढण्यात आली आहे. वांद्रे येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी अडथळा ठरणाऱ्या ५४७ झाडांपैकी २०४ झाडांची कत्तल करण्यात येणार असून ३४३ झाडांना दुसऱ्या ठिकाणी पुनर्रोपण केले जाणार असल्याचे समजते.

येथे उभारणार केंद्र
झाडांची कापणी करण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून पालिका आयुक्त निर्णय घेऊ शकतात, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सात ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रापैकी धारावी व वांद्रे येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले होते. वरळी, वर्सोवा, मालाड, भांडुप, घाटकोपर सह धारावी व वांद्रे या सात सांडपाणी प्रक्रिया केंद्राची क्षमता २४६.४० कोटी लिटर आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.