पहिल्याच प्रयत्नात स्वप्नातील घराची लॉटरी

पहिल्याच प्रयत्नात स्वप्नातील घराची लॉटरी

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : म्हाडाच्या घराची सोडत बुधवारी (ता. १०) ठाण्यात काढण्यात आली. या सोडतीदरम्यान घर लागल्यावर अनेकांच्या चेहऱ्यावरील आनंद हा त्यांच्या शब्दांपेक्षा काही वेगळा अनुभवता आला. या वेळी काही मंडळींना तर पहिल्याच प्रयत्नात स्वप्नातील घर मिळाल्याचे पाहण्यास मिळाले. या वेळी एका विजेत्याने आनंद झाल्याचे बोलून दाखवताच निवेदकाने पार्टी कधी? असा सवाल केल्यावर आज बुधवार आहे तुम्हाला चालले का? असे उत्तर देताच एकच हश्या झाला.
घराची सोडत जवळपास अर्धा तास उशिरा सुरू झाल्याने अर्जदार कंटाळे होते. त्यानंतर सोडतीत पहिले विजेत्यांचे नाव जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे तेही शिंदे निघाले. डोंबिवलीकर असलेले अभिजित शिंदे यांना ठाण्यातील रेमंड येथे स्वप्नातील घराची लॉटरी लागली. त्यांना पहिल्याच प्रयत्नात हे घर लागल्याने स्टेजवर जाताच त्यांना काय बोलू हे सुचत नव्हते. त्यामुळे त्यांच्या पत्नी यांनी घर लागल्याबद्दल मुख्यमंत्र्यांसह म्हाडाचे आभार मानले. त्याचप्रमाणे लोकमान्य नगर येथील शरद हेरेकर हे आपल्या लेकासह या सोडतीत सहभागी झाले होते. त्यांनाही पहिल्या प्रयत्नात घर लागले. त्यांच्या मुलाचे सोडतीत घर लागले याकडे लक्ष नव्हते. पण, पुन्हा ऑनलाईन पाहिल्यावर बापलेकांनी खूप आनंद झाला. याशिवाय ठाणे शहर पोलिस दलात असलेले अमृत सांगळे यांचेही पहिल्या प्रयत्नात घराचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले आहे. त्यांना शीळ फाटा येथील डवले येथे घर लागले आहे. त्यांनी वयाच्या ५० व्या वर्षी घराचे स्वप्न पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com