विभागनिहाय दवाखान्यांमार्फत तंदुरुस्ती प्रमाणपत्र द्या

विभागनिहाय दवाखान्यांमार्फत तंदुरुस्ती प्रमाणपत्र द्या

मुंबई, ता. ११ : हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना विभागनिहाय दवाखान्यांमार्फत वैद्यकीय तपासणी आणि तंदुरुस्ती प्रमाणपत्र देण्याची मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी मुंबई महापालिका आयुक्त व भिवंडी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दरवर्षी भारतातून लाखो नागरिक हज यात्रेसाठी सौदी अरेबियास भेट देतात. या यात्रेला मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने वैद्यकीय तपासणी आणि तंदुरुस्ती प्रमाणपत्र आवश्यक असते. मुंबईसह भिवंडीतूनही मोठ्या संख्येने नागरिक हज यात्रेसाठी रवाना होतात. यात्रेला जाण्यासाठी कोणत्याही एमबीबीएस डॉक्टरमार्फत वैद्यकीय तपासणी आणि तंदुरुस्ती प्रमाणपत्र दिले जात होते; परंतु सरकारने फक्त शासकीय डॉक्टर वैद्यकीय तपासणी आणि तंदुरुस्ती प्रमाणपत्र देऊ शकतात, असे परिपत्रक काढले आहे. मुंबईत सध्या नायर आणि जे. जे. रुग्णालयात ही सुविधा आहे. त्यामुळे यात्रेसाठी जाणाऱ्यांना विभागनिहाय दवाखान्यांमार्फत वैद्यकीय तपासणी आणि तंदुरुस्ती प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार शेख यांनी केली आहे.

विमान प्रवासाबाबत तोडगा काढा
हज यात्रेसाठी निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून विमान प्रवासाची सोय केली जाते. मुंबई आणि औरंगाबाद या शहराच्या विमान भाड्यामध्ये १३,००० हजार रुपयांची तफावत आढळून आली आहे. त्यातच यंदा निविदा प्रक्रियेमध्ये गो-एअर कंपनीची निवड झाली आहे; परंतु गो-एअर कंपनी बंद पडली आहे. त्यामुळे यात्रेकरूंमध्ये संभ्रम आहे. याबाबत तोडगा काढून यात्रेकरूंना दिलासा देण्याची मागणी आमदार रईस शेख यांनी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्र्यांकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com