वरळी बीडीडी चाळ प्रकल्पाचे आज सादरीकरण

वरळी बीडीडी चाळ प्रकल्पाचे आज सादरीकरण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ११ : वरळीतील बीडीडी चाळीच्या पुनर्वसन प्रकल्पाच्या आराखड्यावरून स्थानिकांमध्ये संभ्रम आहे. तसेच सुधारित आराखड्यात वाढवण्यात आलेल्या मजल्यांवरूनही आक्षेप आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिक तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण करावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि म्हाडाकडे केली होती. या मागणीला यश आले असून, उद्या (ता. १२) वरळीत पुनर्वसन प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती म्हाडा मुंबई मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी दिली.

वरळीतील नागरिकांचा बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्प आराखड्यातील काही बाबींना आक्षेप आहे. याबाबत नागरिकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या होत्या. याच मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन रहिवाशांच्या मागण्या सरकारसमोर मांडल्या होत्या. याअनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे वरळी बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाबाबत चाळींतील भाडेकरू आणि रहिवाशांना माहिती देण्याच्या उद्देशाने शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी साडेसहा वाजता वरळी येथील जांभोरी मैदान येथे सादरीकरण करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com