हुंड्यासाठी छळ; सहा जणांवर गुन्हा

हुंड्यासाठी छळ; सहा जणांवर गुन्हा

भिवंडी, ता. ११ (बातमीदार) : माहेरहून दोन लाख रुपये हुंडा आणण्यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सहा जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती आसिफ शहा (वय २९), सासरा शरफुद्दीन शहा (वय ६०), सासू जैतून शहा (वय ५५), दीर तौसिफ शहा (वय ३०), रमजान शहा (वय ४०), सदरून रमजान शहा (वय ३७) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सासरच्या मंडळींची नावे आहेत. फिर्यादी नाजमीन आसिफ शहा ऊर्फ नाजमीन खान (वय २७ रा. कणेरी, भिवंडी) हिचा १७ जानेवारी २०२२ रोजी पालघर जिल्ह्यातील भाईंदर, उत्तन नाका येथील आसिफ शहा याच्याशी विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून सासरच्या मंडळीने आपसात संगनमत करून विवाहिता नाजमीनला लग्नात माहेरहून दोन लाख रुपये हुंडा दिला नाही म्हणून त्यासाठी विवाहितेकडे सतत तगादा लावून धरला होता. सासरच्यांकडून वर्षभर विवाहितेला शिवीगाळ, मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. अखेर या सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने बुधवारी (ता. १०) शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फिर्यादीवरून सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com