पालिकेने आदित्य ठाकरे यांचे गैरव्यवहाराचे आरोप फेटाळले

पालिकेने आदित्य ठाकरे यांचे गैरव्यवहाराचे आरोप फेटाळले

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ ः पालिकेच्या विविध प्रकल्पांच्या कामांमध्ये, तसेच निविदांमध्ये अनियमितता असून गैरव्यवहार झाल्याचे शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलेले आरोप मुंबई महापालिका प्रशासनाने फेटाळले आहेत. पालिकेच्या कामांमध्ये, निविदा प्रक्रियेमध्ये कोणतीही अनियमितता नसून उपस्थित केलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्यात आली असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
आदित्य ठाकरे यांनी पालिकेच्या कामकाजात व निविदांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. याबाबत त्यांनी नुकतीच रमेश बैस यांची भेट घेऊन लोकायुक्तांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. हे आरोप पालिकेने फेटाळले. पालिका नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर, राज्य शासनाने पालिकेवर प्रशासक चहल यांची नियुक्ती करून सर्व अधिकार त्यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. पालिका अधिनियमानुसार पालिकेच्या सर्व समित्यांचे अधिकार आता प्रशासक म्हणून आयुक्तांकडे दिले आहेत. शासनाकडून विहित प्रक्रियेचे पूर्णपणे पालन करून कामकाज सुरू असतानाही प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वारंवार शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.
...
स्पष्टीकरण केले!
रस्ते कामांसाठी पालिकेच्या प्रचलित धोरणानुसार निविदा मागविल्या आहेत. त्यामध्ये सर्व नियमांचे पालन करून कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याबाबतचे सविस्तर विवेचन तसेच पत्रव्यवहार याद्वारे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून माहिती दिली जात नाही, पत्र दिले जात नाही, या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com