Sat, Sept 30, 2023

वांद्रे येथे जलवाहिनी फुटली
वांद्रे येथे जलवाहिनी फुटली
Published on : 11 May 2023, 2:38 am
मुंबई, ता. ११ : मुंबईतील वांद्रे पश्चिम येथे एमएमआरडीचे काम सुरू असताना आज (ता. ११) दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास ९ इंचाची जलवाहिनी फुटली. पालिकेच्या जल अभियंता विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीचे काम हाती घेत पूर्ण केल्याने पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. वांद्रे पश्चिम बडी मस्जिद येथे एमएमआरडीएच्या माध्यमातून काम सुरू असताना ही जलवाहिनी फुटली होती.