Sun, October 1, 2023

पत्नीच्या प्रियकराची पतीकडून हत्या
पत्नीच्या प्रियकराची पतीकडून हत्या
Published on : 11 May 2023, 2:37 am
मुंबई, ता. ११ : अनैतिक संबंधांतून पत्नीची हत्या केल्यानंतर पाच वर्षांनी प्रियकराचीही हत्या केल्याचा प्रकार बुधवारी (ता. १०) घडला आहे. या प्रकरणी जे. जे. मार्ग पोलिसांनी ब्रीजेश प्रसाद याला अटक केली आहे. ब्रीजेश प्रसाद मूळचा बिहारमधील खानेटू येथील रहिवासी आहे. मृत धर्मा नाडर हा ब्रीजेशच्या हाताखाली सफाई कामगार म्हणून काम करीत होता. धर्मा व ब्रीजेशची पत्नी यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे २०१८ मध्ये कळाल्याने ब्रीजेशने पत्नीची हत्या केली. या प्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी त्याला अटक केली होती. या प्रकरणातून तुरुंगातून बाहेर आल्यानंतर बुधवारी ब्रीजेशने डोंगरी इमामवाडा येथे चाकूने भोसकून धर्माची हत्या केल्याचे उघड झाले आहे.