Sun, Sept 24, 2023

आगीत चार बकऱ्यांचा मृत्यू
Mumbai : अचानक घराला आग लागल्याने चार बकऱ्यांचा मृत्यू
Published on : 12 May 2023, 11:56 am
कळवा - झोपडीवजा घराला अचानक आग लागल्याने चार पाळीव बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. मुंब्र्यातील मुंब्रादेवी मंदिर परिसरात असलेल्या कैलासगिरी नगरात डोंगरालगत असलेल्या झोपडीला गुरुवारी (ता. ११) रात्री आग लागल्याची घटना घडली.
मेहमुन शेख यांच्या मालकीची ही झोपडी असून रात्री ते आपल्या घरी झोपले होते. अचानक डोंगराच्या कडेने घराला आग लागल्याने घरात एका बाजूला बांधण्यात आलेल्या चार बकऱ्या व घरातील साहित्य जळून खाक झाले.
मुंब्रा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेख यांनी नुकसानभरपाई मिळण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे.