संक्रमण शिबिरात प्रकल्‍पग्रस्‍त आनंदी

संक्रमण शिबिरात प्रकल्‍पग्रस्‍त आनंदी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मुंबईतील सर्वात मोठा क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्प असलेल्‍या भेंडी बाजार पुनर्वसनातील प्रकल्पग्रस्‍त गेली १० वर्षे संक्रमण शिबिरात राहत आहेत. मात्र तेथील सोयी-सुविधांमुळे नागरिक आनंदी असल्‍याची माहिती रहिवाशांनी दिली आहे. जुन्या चाळीतील छोटी घरे, पिण्याचा पाण्याचा त्रास यापेक्षा ही संक्रमण शिबिरे अतिशय उत्तम असल्‍याचे शिबिरात वास्तव्यास असणाऱ्या अकबर चेशतवाला यांनी सांगितले.
सात वर्षांपूर्वी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात झाली. प्रकल्पासाठी एकूण साडेसोळा एकर क्षेत्र रिकामे करण्यात आले. या वेळी नागरिकांचे तीन संक्रमण शिबिरात स्थलांतर करण्यात आले. यापैकी दोन संक्रमण शिबिरे म्हाडाच्या इमारती; तर एक शिबिर हे सैफी बुऱ्हाणी ट्रस्टच्या जागेत उभारलेल्या इमारती आहेत. त्यापैकी म्हाडाचे एक संक्रमण शिबिर रिकामे करण्यात आले आहे. सद्यस्थितीमध्ये घोडपदेव येथील म्हाडा इमारतीत हे नागरिक वास्तव्यास आहेत. साडेतीन हजाराहून अधिक नागरिकांचे या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले होते. त्यापैकी फेज एकमधील बांधकाम पूर्ण झाल्याने ६२४ हून अधिक नागरिकांना आपल्या घराचा ताबा मिळाला आहे; तर उर्वरित नागरिक अद्याप संक्रमण शिबिरात वास्तव्यास आहेत. फेज दोनमध्ये चार इमारतींमध्ये २,५५० हून अधिक नागरिकांना घरांचा; तर ६५० हून अधिक दुकानदारांना ताबा देण्यात येईल, अशी माहिती सैफी बुऱ्हाणी ट्रस्टने दिली.

माझा जन्म भेंडी बाजारमध्येच झाला. माझे वय आता ७२ वर्षे आहे. आमची जागा एसबीयूटी डेव्हलप करते आहे. आम्ही पूर्वीही एकत्रित राहत होतो. आता येथेही मिळून मिसळून राहतो. येथे कोणताही त्रास नाही. १६०० रुपयांपर्यंतचे विजेचे बिल विकसक भरतात.
- इस्माईल अहमद अली नळवाला, माजी नगरसेवक, प्रकल्पग्रस्त

जुन्या चाळीतील छोटी घरे, पिण्याचा पाण्याचा त्रास यापेक्षा ही संक्रमण शिबिरे अतिशय उत्तम आहेत. कोणताही प्रकल्प उभा राहण्यासाठी वेळ हा लागतोच; मात्र नागरिक संक्रमण शिबिरात होणाऱ्या त्रासाला कंटाळतात; पण आम्हाला येथे कोणताही त्रास नाही.
- अकबर चेशतवाला, प्रकल्‍पग्रस्‍त

व्यावसायिक संक्रमण शिबिरे
भेंडी बाजारमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी मागणी केल्यानुसार त्यांच्यासाठी त्याच परिसरात प्रकल्पानांतर्गत उभारण्यात आलेल्या सेक्टर दोनमध्ये व्यवसाय संक्रमण शिबिरे उभारण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना त्याच्या व्यापारात कोणतेही नुकसान झाले नाही; तर त्यांना व्यवसाय वृद्धीसाठीही त्यातून मदत झाल्याची माहिती सैफी बुऱ्हाणी ट्रस्टने दिली.

संक्रमण शिबिरात पुरविल्या जाणाऱ्या सुविधा

- पूर्णतः फर्निश खोली
- खोलीत एक कपाट कारपेट, खिडक्यांचे पडदे, उश्या
- वॉशिंग मशीन
- मूव्हर अँड पॅकर सुविधा
- ३ दिवस कम्युनिटी किचनमधून मोफत जेवण
- १६०० रुपयांपर्यंत वीजबिल मोफत
- पाणीपट्टी किंवा इतर मेंटेनन्स नाही
- पार्किंगची सुविधा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com