चारोटी टोल नाक्यावर खैर जप्त

चारोटी टोल नाक्यावर खैर जप्त

कासा, ता. १२ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी टोल नाका येथे खैर जातीचे मौल्यवान ओंडके जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी ट्रकचालकास अटक करण्यात आली आहे. ६० हजार रुपये किमतीचे खैराचे ४२४ सोलीव ओंडके बेकायदा वाहतूक करताना आढळून आले. यामध्ये वाहन व खैराचे ओंडके असा ४ लाख ५९ हजार ४३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कासा वनपरिक्षेत्र कार्यालय येथे जमा करण्यात आला आहे.
वनविभाग डहाणू अंतर्गत कासा वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून मौल्यवान लाकडांची तस्करी केली जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार चारोटी टोल नाका येथे वनविभागाने लावलेल्या सापळ्यात गुजरातकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकला थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये खैराचे ओंडके आढळून आले. ही कारवाई डहाणूच्या उपवनसंरक्षक मधुमिता एस. यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक उत्तम पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. कोळी, कासा वनक्षेत्रपाल एन. ए. कांबळे, जी. पी. साळवी, व्ही. एच. चांदगुडे व वनरक्षक वाय. आर. बात्रा, एस. एस. भोये, ए. के. समारंभ, पी. एल. गडग यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com