अर्धवट रस्ता पूर्ण करण्यासाठी भाजपचे निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्धवट रस्ता पूर्ण करण्यासाठी भाजपचे निवेदन
अर्धवट रस्ता पूर्ण करण्यासाठी भाजपचे निवेदन

अर्धवट रस्ता पूर्ण करण्यासाठी भाजपचे निवेदन

sakal_logo
By

दिवा, ता. १३ (बातमीदार) : दिवा शहराजवळ असणाऱ्या बेतवडे गावाजवळील रस्ता महिनाभरापासून नूतनीकरणासाठी खोदण्यात आला आहे. हा रस्ता गावातील प्रमुख रस्ता आहे. पण या रस्त्याचे काम अर्धवट असल्याने रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. जवळपास गेले महिनाभर हा रस्ता खोदून ठेवला असून रस्त्याचे काम आहे बंद आहे. याबाबत भाजपा दिवा मंडळ व्यापारी सेल अध्यक्ष जयदीप भोईर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत त्याचबरोबर बेतवडे गावातील ग्रामस्थ यांच्या माध्यमातून दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील यांना भेटून रस्त्याचे काम लवकरात लवकर चालू करण्याबाबत निवेदन देण्यात आले. येत्या १५ तारखेपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करू, असे आश्वासन पाटील यांनी दिले. यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत आणि ग्रामस्थ उपस्थित होते.