विरारमध्ये सात परिचारिकांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विरारमध्ये सात परिचारिकांचा सत्कार
विरारमध्ये सात परिचारिकांचा सत्कार

विरारमध्ये सात परिचारिकांचा सत्कार

sakal_logo
By

विरार, ता. १३ (बातमीदार) : विरार येथील जोशी बाल रुग्णालयाच्या वतीने सात परिचारिकांचा सत्कार डॉ. अर्चना हेमंत जोशी यांच्या हस्ते तुळशीचे रोप देऊन करण्यात आला. शुक्रवारी (ता. १२) झालेल्या कार्यक्रमात सुमारे ५० हुन अधिक परिचारिका सहभागी झाल्या. गेली १७ वर्षांपासून जोशी बाल रुग्णालयातर्फे दरवर्षी परिचारिकांचा सत्कार करण्यात येत येतो. शारीरिक आरोग्य हा सर्व व्यक्तींच्या दृष्टीने एक जिव्हाळ्याचा विषय आहे. परिचारिका कामात प्राण ओतून रुग्णांची सेवा करतात, अशा परिचारिकांना योग्य तो मान समाजाने देण्याची आवश्यकता आहे. याची जाणीव ठेऊन हा समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सहभागी झालेला सर्व परिचारिकांचे आभार डॉ. अर्चना जोशी यांनी व्यक्त केले. परिचारिकांनी सेवा बजावताना या समाजाचा एक घटक म्हणून सक्षम होण्याची गरज असून सेवेबरोबर स्वतःचे पण आरोग्य उत्तम जपावे. त्याचबरोबर स्वसंरक्षण, उत्तम जनसंपर्क आणि मराठी भाषेचे उत्तम ज्ञान अवगत करून लोकांना आरोग्याबद्दल मार्गदर्शन करावे, असे आवाहन डॉ. जोशी यांनी व्यक्त केले.