मधुमेहाच्या रुग्णांवर एकाच ठिकाणी उपचार

मधुमेहाच्या रुग्णांवर एकाच ठिकाणी उपचार

तुर्भे, ता.१३ (बातमीदार): वाशी येथील फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये नवी मुंबईतील पहिली ‘डायबेटिक फूट’ क्लिनिक सुरू झाले आहे. या क्लिनिकमुळे मधुमेहाच्या रुग्णांवर एकाच छताखाली उपचार केले जाणार आहेत.
मधुमेहाच्या रुग्णांना डायबेटिक फूटसह अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अनेक वेळा या रुग्णांच्या पावलांना पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा होत नसल्याचे जाणवते. या गोष्टीचा त्यांच्या जीवनशैलीवर मोठा परिणाम होतो. तर अशा गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णांचा पाय शस्त्रक्रियेने कापून टाकण्याची देखील वेळ येते. त्यामुळे अशा रुग्णांना अत्यावश्यक शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय उपाययोजना पुरवणे या क्लिनिकमुळे होणार आहे. तसेच या क्लिनिकद्वारे स्क्रिनिंग, पॅथोलॉजी, जखमांची देखभाल, शस्त्रक्रियात्मक उपचार केले जाणार आहेत.
---------------------------------------
मधुमेहाच्या रुग्णांना विविध समस्यांना सोमोरे जावे लागत असते. या समस्यांचा रुग्णाच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होत असल्याने डॉक्टरांच्या समन्वयातून त्यावर उपचार होणे महत्त्वाचे आहे.
-संजय मोहिते, सहआयुक्त, नवी मुंबई पोलिस
-----------------------------
भारतामध्ये मधुमेहाचे ७.८ कोटी रुग्ण आहेत, ज्यापैकी १५ टक्के लोकांमध्ये पायांच्या समस्या आढळून येतात. या १५ टक्के लोकांपैकी १ टक्का लोकांना आपला पाय गमवावा लागतो. मधुमेहाच्या प्रत्येक रुग्णाने वर्षातून एकदा आपल्या पायाची तपासणी करून घेतली पाहिजे.
-डॉ.अरुण बाळ, डायबेटिक फूट सर्जन
-----------------------------------------
टाइप १ आणि टाइप २ डायबेटिसचा त्रास असलेल्या कोणत्याही वयोगटातील रुग्णाच्याबाबतीत डायबेटिक फूटची समस्या उद्भवू शकते. या रुग्णांनी साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवले पाहिजे. आमची टीम अशा रुग्णांच्या देखभालीसाठी एकत्रितपणे काम करणार आहे.
-डॉ. फराह इंगळे, संचालक, इंटर्नल मेडिसीन विभाग, फोर्टीस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com