आरटीओतील कर्मचाऱ्यांमध्ये मधुमेहासह रक्तदाब

आरटीओतील कर्मचाऱ्यांमध्ये मधुमेहासह रक्तदाब

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : ठाणे जिल्ह्यातील रस्ते सुरक्षा अबाधित ठेवण्याबरोबरच वाहन चालविण्याचे परवाना देण्याचे काम करणाऱ्या प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना मधुमेहासह रक्तदाबाचा आजाराने ग्रासलेले असल्याची बाब समोर आली आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग आणि सिव्हिल रुग्णालय यांच्या विद्यमाने नुकतेच आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी मधुमेह, रक्तदाब, दंत चिकित्सा आणि मौखिक कर्करोग आदी तपासणी करण्यात आली.
दैनंदिन धावपळीच्या काळात स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होत असते. छोटा आजारदेखील भविष्यात मोठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग कायमच गजबजलेला असतो. ड्रायव्हिंग परवाना, वाहनासंदर्भात कामे आदी गोष्टी परदेशी परिवहन विभागाच्या तीनहात नका येथील (मर्फी) कार्यालयात होत असतात. नागरिकांची कोणत्या प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी कर्मचारी आणि अधिकारी नेहमीच काळजी घेत असेल, तरी बरेचदा अनेक कर्मचारी आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात. अशा वेळी आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य उत्तम असावे, या दृष्टीने सिव्हिल रुग्णालयाच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोग्य शिबिरात मधुमेह, रक्तदाब, आणि दंतचिकित्सा, मधुमेह रक्तदाब, कर्करोग लक्षणे आदीची तपासणी करण्यात आली. या वेळी अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये मधुमेहासह रक्तदाबाचा आजार असल्याचे समोर आले आहे.
............................
तीन रिक्षाचालकांत कर्करोगपूर्व लक्षणे
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने गुरुवारी प्रादेशिक परिवहन विभाग येथे अधिकारी कर्मचाऱ्यांसह तेथे येणाऱ्या रिक्षाचालकांच्यादेखील मौखिक तपासणी करण्यात आली. या वेळी ५५ जणांचे स्क्रीनिंग करण्यात आले. त्यामध्ये ३० जणांना तंबाखूचे सेवन करीत असल्याचे आढळले असून तीन जणांमध्ये कर्करोगपूर्व लक्षणे आढळून आली असल्याची माहिती डॉ. जीनल रोकडे यांनी दिली.
...........................
कामाच्या व्यापात अनेकदा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ताणतणाव जाणवत असतो. मात्र या तणावात आरोग्याकडे कायमच दुर्लक्ष होत त्यामुळे सर्वांचे आरोग्य उत्तम राहावे, या दृष्टीने हे आरोग्य शिबिर घेण्यात आले होते.
- जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे
……………………….
काहींना तंबाखू सेवन करण्याची सवय असते. हे सेवन कर्करोगाला निमंत्रण देत. वेळीच उपाय केला नाही, तर मृत्यू घडू शकतो. सिव्हिल रुग्णालयाच्या माध्यमातून तंबाखू मुक्ती केंद्र आणि दंतचिकित्सा विभागाकडून जनजागृती मोहीम राबवली जात आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या कर्मचारी आणि अधिकारी यांची दंत आणि मौखिक कर्करोग तपासणी करण्यात आली.
- डॉ. जिनल रोकडे, दंत चिकित्सक, ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com