ठाण्यात राज्यस्तरीय काव्य संमेलन

ठाण्यात राज्यस्तरीय काव्य संमेलन

ठाणे, ता. १३ : अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ आयोजित राज्यस्तरीय काव्य संमेलन व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे भूषवणार आहेत; तर स्वागताध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर असणार आहेत. मराठी ग्रंथसंग्रहालय येथे शुक्रवार १९ मे रोजी दुपारी ३.३० वाजता हे काव्य संमेलन होणार आहे.
महाराष्ट्र जीवनगौरव सावित्रीबाई फुले विद्याभूषण पुरस्कार ठाण्यातील बांदोडकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य चंद्रकांत पाटील यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचरोबर विलेपार्ले येथील प्रमोद तरळ यांना समाजभूषण पुरस्कार, गोवा येथील प्राध्यपक चिन्मय घैसास यांना विद्याभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. उषा निपुणगे यांना ‘मनाचे श्लोक’, डॉ. सुभाष यांना ‘येताना तू नकळत ये’, स्मिता राजमाने यांना ‘भावसरगम’, राजीव प्रधान यांना ‘पहिल्या श्वासापासून’, जीजा मानकर यांना ‘भूमिपुत्राची हाक’, प्रा. अरुण पाटील यांना ‘वावर’, कमलाकर राऊत यांना ‘संगीत श्रावणाचे’, स्वाती वैद्य यांना ‘जिद्द एका सैनिकाची’, जया पाटील यांना ‘चिमुकले जगत’, डॉ. चेतन कुलकर्णी यांना ‘सेल्समनचे आयुष्य’, डॉ. सुनीता चव्हाण यांना ‘भयातून निर्भयाकडे ... सवांद सेतू’ या सर्व लेखक आणि कवींना त्यांच्या पुस्तकासाठी राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्यभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com