Fri, Sept 22, 2023

माजी नगरसेवक कमलकांत मुळे यांचे निधन
माजी नगरसेवक कमलकांत मुळे यांचे निधन
Published on : 13 May 2023, 10:19 am
अंबरनाथ, ता. १३ (बातमीदार) : अंबरनाथ नगर परिषदेतील शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलकांत मुळे ८५ यांचे अल्पकालीन आजारामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना नातवंड असा परिवार आहे. १९७४ ते १९७८ या कालावधीमध्ये अंबरनाथ नगरपालिकेमध्ये शिवसेनेचे आठ नगरसेवक निवडून आले होते. यात कमलकांत मुळे यांचा समावेश होता. शिवसेनेचे गटनेते आणि तत्कालीन शहरप्रमुख शांताराम जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या नगरसेवकांनी काँग्रेसचे नगराध्यक्ष प्रभाकर विठ्ठल ऊर्फ दादासाहेब नलावडे यांना अंबरनाथ शहराच्या विकासकामासाठी बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे अंबरनाथ शहरांमध्ये त्या चार वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली होती. कमलकांत मुळे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.