
बापगांव येथे डॉ. आंबेडकर जयंती
पडघा, ता. १३ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील बापगांव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर (बौद्धवाडा) तथागत मित्र मंडळ व पंचशील महिला बचत गट, बापगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शेलार ग्रामपंचायतीचे सरपंच ॲड. किरण चन्ने उपस्थित होते. शिक्षण घेतले तर माणसाची प्रगल्भता आणि वैचारिक पातळी वाढते. एक सामाजिक जाणीव तयार होते. डॉ. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हा, आम्हाला उभे केले, जगायला शिकवले, असे किरण चन्ने यांनी मार्गदर्शन करताना सांगितले; तर या वेळी ओबीसी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रमोद जाधव, सरपंच भारती गोडे, उपसरपंच बाळाराम गोडे, राजेंद्र गायकवाड, दिलीप जाधव, वीरेन चोरघे, अजय सावंत, अनिल धनगर, कैलास शिर्के, चंद्रकांत गायकवाड, नितीन खंडागळे, सिद्धार्थ गायकवाड उपस्थित होते.