गायी चोरट्यांना रंगेहात पकडले

गायी चोरट्यांना रंगेहात पकडले

खर्डी, ता. १३ (बातमीदार) : गोठ्यात बांधलेल्या दोन गायींना बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन देऊन त्यांना कारमध्ये कोंबून चोरून नेणाऱ्या चार जणांच्या टोळीला स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे रंगेहात पकडण्यात आले. खर्डीजवळील पळशीण गावात शनिवारी (ता. १३) पहाटे ४ च्या दरम्यान ही घटना घडली. या जनावरचोरांना स्थानिक नागरिकांनी खर्डी पोलिसांच्या स्वाधीन केले असून पुढील तपास पोलिस हवालदार मधुकर दहावड करीत आहेत. शनिवारी पहाटे ४ च्या दरम्यान पळशीन-टेंभा रोडनजीक राहत असलेल्या भागवत सापळे यांच्या घराजवळच्या गोठ्यात संशयित चोर फिरत असल्याचा फोन स्थानिकांनी भागवत सापळे यांच्या कुटुंबीयांना केला होता. तेव्हा गोठ्यातून दोन गायी बेशुद्ध अवस्थेत चोरटे गाडीत नेत असल्याचे दिसल्यावर सापळे कुटुंबीयांनी स्थानिक गावकऱ्यांना कळवून मनोज बागुल, आदिल शाह, जुनेद शेख व उजेफा बर्डी (सर्व राहणार पडघा-बोरिवली) यांना रंगेहात पकडून खर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com