ठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

ठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : कर्नाटकमध्ये काँग्रेसला मिळालेल्या ऐतिहासिक प्रतिसादामुळे ठाणे काँग्रेसच्या वतीने शनिवारी (ता. १३) दुपारी ठाणे काँग्रेस कार्यालयाबाहेर जल्लोश करण्यात आला. ढोल-ताशांचा गजर करत फटाके फोडून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. या वेळी ठाणे काँग्रेस (जिल्हा) शहराध्यक्ष अॅड. विक्रांत चव्हाण, शहर काँग्रेस प्रवक्ते सचिन शिंदे, महिला अध्यक्षा वैशाली भोसले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. शहराध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले, की भाजप सरकारने आपल्या सत्तेचा गैरवापर करून कर्नाटकातील काँग्रेस व विरोधी पक्षनेत्यांवर सूडबुद्धीने विविध कारवाया केल्या. त्यामुळे कर्नाटक जनतेने त्यांना त्याची खरी जागा दाखवून दिली. पंतप्रधान फक्त ‘मन की बात’ करत राहिले, ‘जन की बात’ मात्र करीत नव्हते; परंतु काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कायम जनतेमध्ये जाऊन ‘जन की बात’ ऐकत होते, त्याचे प्रश्न समजावून घेत होते. भाजप करत असलेले जातीयवादी विचार कर्नाटक जनतेने उधळून लावले व सर्वधर्म समभावचा नारा देणाऱ्या काँग्रेसला जनतेने साथ दिली, असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com