Fri, Sept 22, 2023

पश्चिम रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना दणका
पश्चिम रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना दणका
Published on : 13 May 2023, 11:48 am
मुंबई, ता. १३ : पश्चिम रेल्वेने एप्रिल महिन्यात अडीच लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत तब्बल १७ कोटीच्या दंड वसूल केला आहे. यामध्ये ४.७१ कोटी रुपये दंड एकट्या मुंबई उपनगरी विभागात वसूल केला आहे. पश्चिम रेल्वेला एप्रिल महिन्यात विनातिकीट/अनियमित प्रवास आणि बुक न केलेल्या सामानाची एकूण २.४६ लाख प्रकरणे आढळून आली. या प्रकरणांमधून १६.७६ कोटी रुपये दंड वसूल केला आहे. याशिवाय एप्रिल महिन्यात पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय विभागात ८३,५२२ प्रकरणे शोधून ४.७१ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. एसी लोकलमध्ये ६ हजार ३०० हून अधिक विनातिकीट प्रवाशांकडून २१.३४ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.