Sun, October 1, 2023

मुंबई-कलबुर्गी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन
मुंबई-कलबुर्गी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन
Published on : 13 May 2023, 11:55 am
मुंबई, ता. १३ : मध्य रेल्वेतर्फे मुंबई ते कलबुर्गी अशी एकेरी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहे. ट्रेन क्र. ०१४८७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून १७ मे २०२३ रोजी रात्री १२.३० वाजता निघेल आणि त्याच दिवशी सकाळी १०.३० वाजता कलबुर्गी येथे पोहोचेल. मुंबई-कलबुर्गी एकेरी सुपरफास्ट स्पेशल ट्रेनला दादर, ठाणे, पनवेल, पुणे, दौंड, कुर्डुवाडी आणि सोलापूर स्थानकांत थांबा असणार आहे. या एक्स्प्रेसला दोन तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी कोच असणार आहेत.