जव्हारमधील महाआरोग्य शिबिराचा ४०० रुग्णांचा लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जव्हारमधील महाआरोग्य शिबिराचा ४०० रुग्णांचा लाभ
जव्हारमधील महाआरोग्य शिबिराचा ४०० रुग्णांचा लाभ

जव्हारमधील महाआरोग्य शिबिराचा ४०० रुग्णांचा लाभ

sakal_logo
By

जव्हार (बातमीदार) : शहरातील पतंग शहा उपजिल्हा रुग्णालय येथे शुक्रवारी (ता. १२) धामणगाव येथील एस. एम. बी. टी. रुग्णालय आणि भाजपचे डॉ. हेमंत सवरा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा ४०० रुग्णांनी लाभ घेऊन आरोग्य तपासणी केली. या वेळी संत रोहिदास चर्मकार आयोगाचे सदस्य कॅप्टन विनीत मुकणे, पालघर जिल्हा परिषदेच्या गटनेत्या सुरेखा थेतले यांची विशेष उपस्थिती लाभली. सोमवारी (ता. १५) या रुग्णांना पुढील उपचारासाठी जन आरोग्य योजनेतून उपचार करण्यासाठी येणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली. या वेळी कुणाल उदावंत, विजया लहारे, नागेश उदावंत, सचिन सटानेकर, सुधीर संखे, सुरेश कोरडा, दयानंद लहारे हे उपस्थित होते.