मोडलेल्या खेळण्यांवर खेळ

मोडलेल्या खेळण्यांवर खेळ

नेरूळ, ता. १४ (बातमीदार)ः नवी मुंबईतील उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. सीवूडस सेक्टर ४२ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील लहान मुलांची खेळणी तसेच ओपन जिमचे साहित्य नादुरुस्त आहे. त्यामुळे मोडलेल्या खेळाच्या साहित्यामुळे अपघाताची भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबई शहरातील प्रत्येक नोडमध्ये पालिकेने उद्यानांची निर्मिती केली आहे. या उद्यानांमुळे नागरिकांना विरंगुळ्याचे हक्काचे ठिकाण तयार झाले आहे. पण पालिकेच्या दुर्लक्षामुळे सध्या उद्यानांची अवस्था बिकट झाली आहे. सीवूड्स सेक्टर ४६, ४८ मधील उद्यानांतील खेळणी मोडलेल्या अवस्थेत आहेत. अशातच शाळांना सुट्ट्या लागल्या असल्याने सध्या उद्यानात येणाऱ्या मुलांची संख्या वाढली आहे. पण उद्यानातील मोडलेल्या खेळण्यांमुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच उद्यानातील जलवाहिनीलाही गळती असल्याने ठिकठिकाणी पाणी साचत आहे. याबाबत विविध पक्ष संघटना स्थानिक, रहिवासी तसेच स्थानिक नगरसेवकांकडून तीन वर्षांपासून संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जात आहे; परंतु या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
-----------------------------------------------
उद्यानातील खेळण्याचे साहित्य तुटलेल्या अवस्थेत आहे. सुट्टी लागल्यामुळे मुले उद्यानात जाण्याचा हट्ट करतात; परंतु उद्यानातील तुटलेल्या साहित्यामुळे खेळताना दुखापत होण्याची शक्यता आहे.
- पल्लवी लोखंडे, नागरिक
----------------------------
उद्यानातील मोडलेले साहित्य तसेच जलवाहिनीच्या गळतीबाबत महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार केली आहे; पण विभाग अधिकाऱ्यांकडून या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
- विशाल डोळस, माजी नगरसेवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com