Tue, October 3, 2023

ऑटोरीक्षा-दुचाकी अपघातात सहा जखमी
ऑटोरीक्षा-दुचाकी अपघातात सहा जखमी
Published on : 14 May 2023, 2:56 am
वाडा, ता. १४ (बातमीदार) : वाडा-मनोर महामार्गावरील पालीजवळील पिंजाळ पुलावर शनिवारी रात्रीच्या सुमारास रिक्षा व दुचाकीच्या झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाले. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर येथील प्रवीण वझरे, प्रशांत गुजर, मिलिंद गुजर हे तिघे जण दुचाकीवरून लग्नानिमित्त विक्रमगडच्या दिशेने जात होते. त्याच वेळी समोरून येणाऱ्या रिक्षाला त्यांची धडक बसल्याने रिक्षातील बशीर शेख, जयबीन शेख व समीर शेख व दुचाकीवरील तिघे असे सहा जण गंभीर जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी सायन रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.