Fri, Sept 22, 2023

ट्रक दरीत कोसळून दोनजण गंभीर
ट्रक दरीत कोसळून दोनजण गंभीर
Published on : 14 May 2023, 3:04 am
सरळगाव, ता. १४ (बातमीदार) : कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात एका वळणावर १०० फूट दरीत ट्रक कोसळल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात वाहनचालक व क्लिनर गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी (ता. १३) सायंकाळी माळशेज घाटमार्गे भिवंडी वाडा येथे उसाने भरलेला ट्रक जात होता. माळशेज घाटातील आंब्याच्या वळणावर ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने १०० फूट दरीत ट्रक कोसळला. यात वाहनचालक उत्तम राठोड व क्लिनर अजय राठोड हे दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस अधिकारी व टोकावडे पोलिस ठाण्याच्या पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमींना मोरोशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.