चार वाहनांची एकमेकांना धडक

चार वाहनांची एकमेकांना धडक

कासा, ता. १४ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंबोली येथील उड्डाणपुलावर चार वाहने एकमेकांना धडकून विचित्र अपघात झाला आहे. यामुळे महामार्गावर साधारण दोन तास वाहतूक कोंडी झाली होती.
रविवारी (ता. १४) सकाळी ११ च्या सुमारास आंबोली उड्डाणपुलावर मुंबईकडून गुजरातच्या दिशेला जाणारा कंटेनर, आयशर, ट्रक आणि एक लहान चारचाकी वाहन एकमेकांना धडकून अपघात झाला आहे. उड्डाणपुलावर चढण असल्यामुळे वाहनांचा वेग कमी होऊन अपघाताची तीव्रता सौम्य होती. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसून वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे; मात्र ही वाहने महामार्गाच्या मध्ये असल्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. घटनास्थळी महामार्ग पोलिस व कासा पोलिस तसेच महामार्ग प्रशासनाचे कर्मचाऱ्यांनी पोहचून वाहतूक सुरळीत केली. त्याचबरोबर अपघातग्रस्त वाहने बाजूस घेण्यात आली. काही काळ वाहतूक पुलाच्या शेजारील सेवा रस्त्यावरून वळवण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com