Fri, Sept 22, 2023

वर्तकनगरमध्ये महानगर गॅसलाईनला गळती
वर्तकनगरमध्ये महानगर गॅसलाईनला गळती
Published on : 14 May 2023, 3:10 am
ठाणे, ता. १४ (वार्ताहर) : ठाण्यात अधिकृत आणि अनधिकृत बांधकामांचे खोदकाम किंवा रस्ता खोदकामाच्या वेळी भूमिगत असलेल्या महानगर गॅसची पाईपलाईन लिकेज होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. रविवारी (ता. १४) संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास वर्तकनगर परिसरात महानगरची गॅसलाईन लिकेज झाली. घटनास्थळी अग्निशमन दल आणि महानगर गॅसचे कर्मचारी यांनी गळती काढली. दरम्यान दुरुस्तीच्या कामासाठी वर्तकनगर परिसरातील गॅस पुरवठा खंडित करण्यात आलेला होता. तब्बल दीड तासाने गॅस पुरवठा सुरळीत करण्यात आला.