
सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव
सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. १४ ः मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या नव्या सागरी महामार्गाला (कोस्टल रोडला) छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. सागरी महामार्गाला संभाजी महाराजांचे नाव द्यावे, अशी विनंती करणारे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६ मार्चला पाठवले होते.
मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवणे ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री या नात्याने हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन सरकारच्या वतीने मी देतो, असेही शिंदे यांनी आज या कार्यक्रमात घोषित केले. आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांचे पुण्यस्मरण करणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संभाजीनगर येथे झालेल्या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह हजर होते.
...
वांद्रे-वर्सोवा सीलिंक सावरकर मार्ग?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी करणाऱ्या पत्रात वांद्रे-वर्सोवा सीलिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात यावे तसेच मुंबई ट्रान्स हार्बरलिंकला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे, अशा मागण्याही केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले आहेत.