Sun, October 1, 2023

घोलवडमध्ये आरोग्य तपासणी शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद
घोलवडमध्ये आरोग्य तपासणी शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद
Published on : 15 May 2023, 11:49 am
बोर्डी (बातमीदार) : मातृदिन, तसेच देवी रोगाच्या लसीच्या संशोधनाचा दिवस याचे औचित्य साधून घोलवड येथे विनामूल्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला काही डॉक्टर मलेशियातून आले होते. डॉ. एम. एल. ढवळे मेमोरिअल ट्रस्ट हॉस्पिटल, मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद आणि घोलवड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर आयोजित करण्यात आले होते. सु. पे. ह. हायस्कूलचे माजी शिक्षक नितीन बारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून शिबिराला सुरुवात करण्यात आली. शिबिराला डॉ. जितेश ठाकूर, डॉ. सुवास दारवेकर, डॉ. जगदीश पगारे, जयंत माच्छी, अशोक बुरकुंडे, महेश मोठे, जगदीश मळवलकर, अशोक धोडी, मनीष जोंधळेकर, राम भुजड आदी उपस्थित होते. घोलवडचे सरपंच रवींद्र बुजड, उपसरपंच कुणाल शाह यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.