आंबाप्रेमींसाठी बाजारात आनंदवार्ता

आंबाप्रेमींसाठी बाजारात आनंदवार्ता

तुर्भे, ता. १५ (बातमीदार) : वातावरणातील उष्मा वाढत असल्यामुळे फळे लवकर तयार होत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यासह परराज्यांतून मोठ्या प्रमाणात वाशीच्या एपीएमसी बाजारात आंबे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आवक वाढल्याने आंब्याचे दर खाली आल्याने खवय्यांना आत्ता मनसोक्तपणे आंब्याचा आस्वाद घेता येणार आहे.
लहरी हवामानाचा यंदा आंब्याला मोठा फटका बसला होता. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा आंब्याच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाल्याचे जाणवत आहे. वातावरणातील बदलाचा सर्वाधिक फटका हा कोकणातील हापूस आंब्याला बसल्याने यंदा हापूसचे उत्पादन १७ ते १८ टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे ऐन हंगामात हापूस आंब्याचे दर डझनाला १००० रुपयांच्या वर गेले आहेत; तर दुसरीकडे बाजारात हापूस कमी प्रमाणात आल्याने कर्नाटकी आंब्यापाठोपाठ बदामी, केसर, लालबाग, तोतापुरी अशा आंब्याला ग्राहकांची अधिक पसंती मिळत आहे. त्यामुळे इतर जातीच्या आंब्यांना मागणी वाढल्याने एप्रिल आणि मे महिन्यापर्यंत आंबा खरेदी करताना ग्राहकांचा खिसा रिकामा होत आहे. मात्र १० मे पासून राज्यासह परराज्यांतील आंब्यांची आवक वाढली असल्याने दरात ही घसरण सुरू आहे. यामुळे आंबा आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे.
-----------------------------------------------
बाजारात हापूसबरोबरच कर्नाटक, दक्षिण भारतातून बदामी, लालबाग, तोतापुरी आंबा येत आहे; तर गुजरातवरून केसर आंब्याची आवक वाढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनादेखील विविध पर्याय उपलब्ध असल्याने दर नियंत्रणात आले आहेत. तसेच वातावरणातील वाढलेल्या उष्म्यामुळे फळधारणा लवकर होत असल्याने आंबा खराब होण्याच्या भीतीने कमी दरात विक्रीसाठी काढण्यात आला आहे.
---------------------------------------------
राज्यासह परराज्यांतून आंब्याची आवक वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. शिवाय आवक वाढल्याने दरांमध्ये देखील घसरण झाली असून सर्वांना आंब्याचा आस्वाद घेता येणार आहे.
- संजय पानसरे, संचालक, फळबाजार, वाशी
--------------------------------------------
आत्ताचे घाऊक दर (डझनाला) पूर्वीचे दर
हापूस आंबा - ५०० ते १००० १००० ते १२००
कर्नाटक आंबे - ५० ते १०० ८० ते १५०
बदामी - ३० ते ८० ७० ते १२०
लालबाग - ३० ते ५० ५० ते १००
केसर - ५० ते १०० ८० ते १२०
तोतापुरी -३० ते ६० ५० ते ७०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com