रुग्णालयांमध्ये सोप्या भाषेत कायमस्वरूपी माहिती फलक

रुग्णालयांमध्ये सोप्या भाषेत कायमस्वरूपी माहिती फलक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मुंबईसह राज्य सरकारच्या प्रमुख आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये केवळ शहरी भागातूनच नव्हे, तर ग्रामीण भागातूनही लोक उपचारासाठी येतात. ग्रामीण भागातून येणाऱ्या बहुतांश रुग्णांसाठी रुग्णालयात सुविधा कुठे उपलब्ध आहेत? रुग्णालयांमध्ये लावण्यात आलेल्या माहिती फलकांवरून ही माहिती समजत नाही. याचे प्रमुख कारण फलकावर वापरलेली भाषा असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच आता आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सर्व रुग्णालयांमध्ये सोप्या भाषेत कायमस्वरूपी माहिती देणारे फलक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत, जेणेकरून रुग्णालयांमध्ये कोणत्या सुविधा आहेत, हे समजेल.
राज्यातील आरोग्य सुविधांबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी शनिवारी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या निर्देशामध्ये रुग्णालयांमध्ये सोप्या भाषेत माहिती फलक लावण्याची सूचनाही त्‍यांनी दिल्‍या. या बैठकीत त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील उपसंचालकांना आरोग्यविषयक समस्यांबाबत आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासोबतच त्यांनी इतर राज्यांच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेऊन सविस्तर अहवाल देण्यास सांगितले आहे. सावंत यांनी नागरिकांना त्यांच्या घराजवळ उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपला दवाखान्याचा विस्तार करण्याचे निर्देशही दिले आहेत. सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ३०० हून अधिक आपला दवाखाने सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com