सिलिंडरच्या वाहनांचा रहदारीला अडथळा

सिलिंडरच्या वाहनांचा रहदारीला अडथळा

नेरूळ, ता.१५ (बातमीदार)ः घरगुती तसेच व्यावसायिक सिलिंडरची हाताळणी शहरातील विविध वसाहतींमध्ये केली जात आहे. या प्रकारामुळे अनेकदा रस्त्यावरच वाहनांची कोंडी होण्याचे प्रकार घडत असून गॅस सिलिंडरच्या हाताळून मोठ्या दुर्घटनेची देखील शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभाग आणि वाहतूक विभागाने याबाबत ठोस नियमावली करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
नवी मुंबई शहरातील वाशी, कोपरखैरणे, सानपाडा, घणसोली, नेरूळ या भागात घरगुती सिलिंडर पुरवणाऱ्या एजन्सी आहेत. या ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने सिलिंडरची वाहतूक करणारी वाहने येत असतात. या वाहनांमधूनच शहरातील इतर भागात गॅस सिलिंडरचे वितरण करणारी छोट्या वाहनांमध्ये सिलिंडर भरले जातात. मात्र, होणारी गॅस हाताळणी रस्त्यावरच होत असल्यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी होत असते. तसेच या प्रकारामुळे अपघाताची देखील शक्यता वर्तवली जात असल्याने रस्त्यावरच होत असलेल्या प्रकारांमुळे भविष्यात मोठ्या दुर्घटनेची शक्यता आहे. त्यामुळे नागरी वसाहतीपासून अशा प्रकारची वाहने दूर ठेवावीत, अशी मागणी होत आहे.
--------------------------------------------
वाशी, कोपरखैरणे मार्गावर मरिआई मंदिरासमोर रस्त्यावरच गॅस हाताळणी केले जाते. यातील बहुतांश वाहने ही वाहतुकीच्या विरुद्ध बाजूने उभी असतात. त्यामुळे अपघाताची शक्यता अधिक आहे.
-प्रवीण पाटील, वाहनचालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com