पनवेल महापालिकेत पुन्हा खांदेपालट

पनवेल महापालिकेत पुन्हा खांदेपालट

पनवेल, ता.१५(बातमीदार) : पनवेल महापालिकेच्या प्रभाग ‘ड’ समितीचे अधिकारी दीपक सिलकन यांची बदली करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यात या पदावर बसलेल्या सहा अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आली असल्याने महापालिकेत विविध चर्चांना उधाण आले आहे.
पनवेल महापालिकेच्या अंतर्गत चार प्रभाग समिती येतात. त्यामध्ये खारघर, कामोठे, कळंबोली आणि पनवेल असे चार प्रभाग येतात. प्रभाग‘ड’मध्ये नवीन पनवेलचा काही भाग, पोदी, रेल्वे स्टेशन, तक्का, काळुंद्रे, पनवेल शहर असा भाग येतो. या प्रभागामध्ये महापालिकेचे मुख्यालय ही येथे आहे. त्यामुळे कामकाजाच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा असा हा प्रभाग असल्याने लोकप्रतिनिधी, राजकीय नेते यांचे बारीक लक्ष असलेला हा प्रभाग आहे. विशेष म्हणजे, अशा बदल्या पनवेल महापालिकेच्या इतर प्रभागांमध्ये होत नसल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
-------------------------------------
काही दिवसातच उचलबांगडी
या प्रभागाच्या अधिकारी पदावर आत्तापर्यंत ज्यांच्या नेमणूका झाल्यात त्यांना काही दिवसातच खुर्ची सोडावी लागत आहे. आत्तापर्यंत श्रीराम हजारे, हरिचंद्र कडू, दशरथ भंडारी, सदाशिव कवठे, अमर पाटील, दीपक सिलकन या अधिकाऱ्यांनी या पदावर काम केले आहे. सध्या रोशन माळी हे प्रभाग अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com