आत्मीय मार्ग वाहतुकीस खुला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आत्मीय मार्ग वाहतुकीस खुला
आत्मीय मार्ग वाहतुकीस खुला

आत्मीय मार्ग वाहतुकीस खुला

sakal_logo
By

कांदिवली, ता. १५ (बातमीदार) ः कांदिवली पूर्वेला अशोक नगर महापालिका मराठी शाळेच्या मैदानाला लागून असलेल्या आत्मीय मार्गाच्या गटाराचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. येथे ठेकेदाराने चक्क तीन दिवसांपासून बॅरिकेड्स लावून मार्गच बंद केला होता. यामुळे वाहनचालकांची दिशाभूल झाल्याने वाहतुकीची कोंडी होत होती. याबाबत शुक्रवारी (ता. १२) ‘गटाराच्या कामासाठी रस्ता बंद’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. याची दखल घेत पालिका अभियंता समीर सानप यांनी तातडीने ठेकेदार आणि सुपर वायझर यांना सांगून वाहतुकीस एक बाजुचा मार्ग खुला केला. यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
कांदिवली पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या हुतात्मा राजगुरू उड्डाणपुलावरून पूर्वेला खाली येताच डावीकडे मैदानाच्या बाजूलाच असलेल्या आत्मीय मार्गाने वाहने स्टेशनकडे जातात. मैदानाच्या बाजूने जेसीबीच्या साह्याने खोदकाम करून, माती, दगड आणि डबर भरण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी अडथळा होऊ नये म्हणून गेले तीन दिवसांपासून बॅरिकेड्स आडवे लावून मार्गच बंद करण्यात आला होता. यामुळे नेहमीच्या सवयीप्रमाणे येणार्‌या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. या संदर्भात बातमी प्रसिद्ध होताच कामाच्या बाजुचा एक मार्ग खुला केल्‍याने वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.