कल्याणमध्ये महाराणा प्रताप सिंह जयंती साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणमध्ये महाराणा प्रताप सिंह जयंती साजरी
कल्याणमध्ये महाराणा प्रताप सिंह जयंती साजरी

कल्याणमध्ये महाराणा प्रताप सिंह जयंती साजरी

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १५ (बातमीदार) : राजपूत समाजाचे प्रेरणा स्थान देवत, क्रांतिसूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची ४८३ वी सार्वजनिक जयंती महोत्सव उत्साहपूर्वक वातावरणात पार पडला. महाराणा क्षत्रिय राजपूत समाज सेवाभावी संस्था कल्याणतर्फे दि.९ मे रोजी सायंकाळी ५ ते १० वाजे दरम्यान मराठी जाती हॉल आचार्य अत्रे रंगमंदिरासमोर झाला. कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम हॉल पासून ते शिवाजी चौक पर्यंत भव्य मिरवणूक जोरदार जल्लोष काढण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात श्री महाराणा प्रतापसिंहांच्या प्रतिमाचे पूजन करून द्वीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राजपूत समाज मंडळाचे माजी अध्यक्ष विजू तात्या यांनी भूषविले होते. तर सीमा पाटील, सुरेख राजपूत, सुवर्णा राजपूत, सुरेख देवरे यांनी स्वागत गीत गाऊन मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला आमदार विश्वनाथ भोईर, अजयसिंगजी सेगर (करणी सेना), रवींद्र राजपूत (मेट्रो अधिकारी), आर के पाटील (अध्यक्ष राजपूत समाज सेवा संघ ठाणे) आदी उपस्थित होते.