
वाढदिवसाला शिक्षण साहित्य भेट
बदलापूर, ता. १५ (बातमीदार) : बॅनरबाजी, महागड्या भेटवस्तू, फटाके, बुके, कपडे, शाल अशा वस्तू भेट देऊ नका तर, समाजातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्याचा मानस व्यक्त करत, माजी नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तसे आवाहन केले. तसेच स्वतः तुकाराम म्हात्रे यांनी शिक्षणाचे महत्व जाणून अनाथ आश्रम, आदिवासी शाळा, गोर गरीब विद्यार्थी यांना शिक्षणात येणाऱ्या अडचणी, लक्षात घेऊन ते गेल्या पाच ते सहा वर्षांपासून गोर गरीब विद्यार्थ्यांना वही, पेन, दप्तर, पुस्तके इतर शालेय वस्तूंचे वाटप करत आहेत. अनेक आदिवासी शाळा त्यांनी या निमित्ताने दत्तक घेतल्या आहेत. त्यामुळे यंदा देखील हाच पायंडा रचण्यासाठी त्यांनी आपल्या तमाम समर्थक व कार्यकर्त्यांना आपल्या वाढदिवसाच्या दिवशी बॅनरबाजी, भेटवस्तु, बुके, शाल हे देण्यापेक्षा शालेय वस्तु भेट स्वरुपात देण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या कल्पनेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.