धसईच्या तरुणांची मुंबई अग्निशमन दलात निवड

धसईच्या तरुणांची मुंबई अग्निशमन दलात निवड

किन्हवली, ता.१५ (बातमीदार) : मुंबई महापालिकेतील अग्निशमन दलाच्या जानेवारी महिन्यात झालेल्या भरती प्रक्रियेत शहापूर तालुक्यातील धसई येथील दोन तरुणांची निवड झाली आहे. १३ जानेवारीला झालेल्या भरती प्रक्रियेत शहापूर तालुक्यातील धसई गावचे नरेश काशिनाथ फर्डे व विनोद दत्तात्रेय बांगर हे दोन तरुणांची अग्निशामक पदासाठी निवड झाली आहे. शेतकरी कुटुंबातील हे दोघे तीन वर्षांपासून मेहनत घेत होते. संतुलित आहार, दररोज सकाळी पाच कि.मी. धावणे, व्यायाम, वेगवेगळ्या कसरती यांवर अधिक भर देत होते. त्यांची हीच मेहनत, जिद्द आणि चिकाटीमुळे त्यांना यश आल्याने पालकांनी आनंद व्यक्त केला आहे. पालघर जिल्ह्यातील झडपोली येथील जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात या तरुणांना मोफत राहण्याची व खाण्याच्या सुविधेसोबतच नितीन जगन्नाथ फर्डे व हर्षल विष्णू फर्डे या प्रशिक्षकांचे अचूक व उत्तम मार्गदर्शन मिळाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com