Fri, Sept 29, 2023

वाड्यात आदिवासी तरुणीची आत्महत्या?
वाड्यात आदिवासी तरुणीची आत्महत्या?
Published on : 15 May 2023, 3:43 am
वाडा, ता. १५ (बातमीदार) : तालुक्यातील कापरी गावची एक तरुणी ९ मेपासून बेपत्ता होती. अखेर बेपत्ता तरुणीचा मृतदेह सोमवारी (ता. १५) जंगलात एका झाडाला लटकळत असल्याचे उघडकीस आले असून ही आत्महत्या की हत्या, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. दर्शना विलास धोडी (वय २२) असे मृत तरुणीचे नाव आहे. कापरी येथील रहिवासी असलेली दर्शना ही येथीलच एका फार्म हाऊसवर कामाला होती. ती गेल्या ९ तारखेपासून कामावरून घरी परतलीच नाही. कुटुंबीयांनी तिची सर्वत्र शोधाशोध केली होती. अखेर सोमवारी येथील जंगलात तिचा मृतदेह एका झाडाला लटकळत असताना दिसला. मृतदेह वाडा ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेची सखोल चौकशी करून सत्य उजेडात आणण्याची मागणी आदिवासी समाजाचे नेते अनंता वनगा यांनी केली आहे.