बोरिवलीत फेरीवाल्यांची मक्तेदारी

बोरिवलीत फेरीवाल्यांची मक्तेदारी

मालाड, ता. १६ (बातमीदार) ः बोरिवली रेल्‍वे स्‍थानच्या पश्‍चिम भागात फेरीवाल्‍यांनी आपले बस्‍तान मांडले असल्‍याचे चित्र पहायला मिळत आहे. दुपारी तीननंतर मोक्ष प्लाझा ते कोर्ट इमारतीपर्यंत हे फेरीवाले रस्‍त्‍यावरच दुकाने थाटत असल्‍याने नागरिकांसह वाहनचालकांना येथून प्रवास करणे अवघड जात आहे. याबाबत पालिकेने ठोस कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
मोक्ष प्लाझा ते कोर्ट इमारतीपर्यंतचा रस्‍ता दुपारच्या वेळेत अधिक रहदारीचा नसतो. मात्र दुपारनंतर येथून वाहनांची व नागरिकांची वर्दळ सुरू होते. अशावेळी येथे फेरीवाले आपले बस्‍तान मांडत असल्‍याचे दिसून येत आहे. हे फेरीवाले पदपथांसह रस्‍त्‍यावरही आपला व्यवसाय मांडत असल्‍याने नागरिकांना येथून प्रवास करताना कसरत करावी लागते. येथील बस स्‍थानकातही अनेकदा हे फेरीवाले बसत असल्‍याने प्रवाशांना येथे उभे राहणेही अवघड जात आहे. याबाबत पालिकेने ठोस कारवाई करण्याची गरज नागरिकांनी व्यक्‍त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com