पादचारी पुलावर अस्वच्छतेचे ठाण

पादचारी पुलावर अस्वच्छतेचे ठाण

घणसोली, ता. १७ (बातमीदार)ः ऐरोली विभागातून सेक्टर १ मधील चिंचपाडा परिसराला जोडणाऱ्या पादचारी पुलाची दयनीय अवस्था झाली आहे. या पुलावर स्थानिक रहिवाशांकडून कपडे वाळत टाकले जात असून अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सर्वत्र अस्वच्छता पसरली असल्याने महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
ऐरोलीमधून दिघा चिंचपाडा परिसरात जाणाऱ्यांसाठी महापालिकेच्या वतीने ऐरोली नाका येथे पादचारी पूल उभारण्यात आला आहे. या पुलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. असे असताना अनेक महिन्यांपासून येथे अस्वच्छतेने ठाण मांडलेले आहे. पुलाच्या खालच्या बाजूला कचऱ्याचे ढीग लागले असून रात्री मद्यपान केले जात असल्याने दारूच्या बाटल्या, गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी परिसराला अवकळा आलेली आहे. तसेच या पादचारी पुलावर बसवण्यात आलेल्या लाद्या तुटलेल्या असल्याने दुखापतीची शक्यता आहे. तसेच पुलाच्या संरक्षणासाठी पायऱ्यांना लावण्यात आलेल्या लोखंडी रेलिंगदेखील कमकुवत झाल्याने अपघाताचा धोका असल्याची चर्चा रंगली आहे.
------------------------------------------
फेरीवाल्यांचे अतिक्रमण
या पुलाखाली फेरीवाल्यांनी व्यवसाय थाटला आहे. तसेच या पुलावर छप्पर नसल्याने ऊन-पावसातच प्रवास करताना नागरिकांचे हाल होत आहे. त्यामुळे या पुलावर छप्पर बसवावे, अशी मागणी नागरिक करत आहेत; पण महापालिकेचे अधिकारी याकडे डोळेझाक करत असल्याने पादचारी पुलाची अवस्था दयनीय झाली आहे.
----------------------------------
ऐरोली नाका पादचारी पुलाच्या दुरुस्तीसाठी ठेकेदाराची नेमणूक करण्यात आलेली नाही. तात्पुरती साफसफाई केली जाईल. तसेच गोष्टी या कंत्राटदार नेमणूक केल्यानंतर होतील.
- महेंद्र सर्पे, विभाग अधिकारी, ऐरोली
------------------------------------------
ऐरोली नाका पादचारी पुलाची अवस्था वाईट आहे. या ठिकाणी कचऱ्यामुळे दुर्गंधीला सामोरे जावे लागते. तसेच हा पादचारी पूल कपडे वाळत घालण्यासाठी तयार केल्याचे चित्र या ठिकाणी रोजच पाहायला मिळते.
- नवीन मिश्रा, पादचारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com