आरोग्य उपकरणे धूळखात

आरोग्य उपकरणे धूळखात

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबईसह राज्याच्या रुग्णालयांमध्ये आयसीयू ते सामान्य खाटांचा तुटवडा नेहमीच असतो. या टंचाईचा सामना करूनही बंद असलेल्या जंबो कोविड सेंटरच्या व्हेंटिलेटरच्या रिकाम्या खाटांची काळजी कोणी घेताना दिसत नाही. यामुळे सेव्हन हिल्स आणि के. जे. सोमय्या जम्बो कोविड सेंटरमध्ये अनेक आरोग्य उपकरणे नादुरुस्त अवस्थेत पडून आहेत. या उपकरणांचे नीट संगोपन न झाल्याने ते धूळ खाऊन खराब होत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्‍त केली जात आहे.
कोविडचा प्रादुर्भाव झाल्यानंतर मुंबई महापालिकेने विविध सरकारी प्राधिकरणांच्या सहकार्याने शहर आणि उपनगरात १० जंबो कोविड केंद्र सुरू केले. मात्र, तिसऱ्या लाटेनंतर देखभालीत सरस ठरलेली ही जंबो कोविड सेंटर्स महापालिका प्रशासनाने टप्प्याटप्प्याने बंद केली. हे केंद्र बंद होऊन जवळपास एक वर्ष उलटून गेले आहे; मात्र अद्यापही कोविड केंद्रातील अर्ध्याहून अधिक उपकरणांची देखभाल करण्यास कोणी तयार नसल्‍याचे दिसून येत आहे. त्यामुळे सेव्हन हिल्स रुग्णालयात शौचालयाजवळील अनेक ठिकाणी यंत्रे पडून आहेत. या मशिन नादुरुस्त अवस्थेत पडल्याने ते बंद पडण्याच्या मार्गावर आले आहे.

पालिकेकडे ७३ हजारांहून अधिक वस्तू शिल्लक
मरोळच्या सेव्हन हिल्स रुग्णालय आणि के. जे. सोमय्या जम्बो सेंटरमध्ये महापालिकेच्या ४१८ पेक्षा जास्त प्रकारच्या ७३ हजार वस्तू पडून आहेत. या वस्तूंमध्ये खाटा, गाद्या, चादरी, सलाईन स्टँड, उशा, ऑक्सिजन फ्लो मीटर, पंखे इत्यादींचा समावेश आहे.

लाइफ सेव्हिंग डिव्हाईसची दुरवस्‍था?
महापालिकेजवळील गोदामात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, मल्टीपॅरा मॉनिटर्स यांसारखी वैद्यकीय उपकरणेही खराब होत आहेत. महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सुमारे २०० व्हेंटिलेटरपैकी महापालिकेला पीएम केअर फंडातून १०० व्हेंटिलेटर मिळाले आहेत. याशिवाय ८०० हून अधिक पोर्टेबल ऑक्सिजन सिलिंडर, ६०० हून अधिक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यांसारखी जीवरक्षक उपकरणेही धूळ खात पडली आहेत.

राज्य सरकारला पत्र
महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी या उपकरणांबाबत तीन महिन्यांपूर्वी राज्याच्या आरोग्य विभागाला पत्र लिहिले होते. या वेळी तेथील काही रुग्णालयांनी स्वारस्य दाखवले होते. नोव्हेंबरपासून काही जिल्हा रुग्णालयांना पाच हजारांहून अधिक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.

ाया रुग्‍णालयांनी घेतली उपकरणे
पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांनी आवश्यकतेनुसार उपकरणे घेतली आहेत. यामध्ये नायर रुग्णालयाने वरळी एनएससीआय जम्बो कोविड सेंटरची सर्व उपकरणे घेतली आहेत. दुसऱ्या टप्प्यात शासकीय दंत महाविद्यालय, धुळे, नाशिक, ठाणे, मालेगाव शासकीय रुग्णालय, पोलिस रुग्णालय आणि कस्तुरबा रुग्णालयाला अनेक उपकरणांचे वाटप करण्यात आले.

अधिकारी काय म्हणतात?
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, सध्या त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. ते लवकरच या सर्व साधनांचा आढावा घेऊन यावर ठोस पावले उचलणार आहेत.

महापालिकेकडे या आहेत वस्तू
खाटा ८०००
गाद्या ९००७
उशी ७४८९
ब्लँकेट ३८०१
सलाईन स्टँड ४६६९
बेडसाइड लॉकर ३३०२
ऑक्‍सिजन फ्लो मीटर १०३३
पोर्टेबल ऑक्सिजन सिलेंडर ८२६
एजीव्हीए व्हेंटिलेटर ९४
मल्टीपॅरा मॉनिटर ८५
स्कॅन रे व्हेंटी मशीन ७०
ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर ५०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com