Sun, Sept 24, 2023

पडघा येथे करिअर मार्गदर्शन शिबिर
पडघा येथे करिअर मार्गदर्शन शिबिर
Published on : 16 May 2023, 11:34 am
पडघा, ता. १६ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील १० वी १२ शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन करण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भिवंडी यांच्या वतीने ‘छत्रपती शाहू महाराज करिअर शिबिर’ समुपदेशन मेळाव्याचे आयोजन गुरुवार करण्यात आले आहे. हे शिबिर १८ मे रोजी सकाळी १० ते २ या वेळेत लोहाणा महाजनवाडी हॉल पडघा येथे पार पडणार आहे. यावेळी विविध मान्यवर तज्ज्ञ उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शिबिराला उपस्थित राहावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.